लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात वाढ; पहा काय आहे आजचा दर

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर यंदा विक्रमी सोने खरेदी झाली. यासाठी सोन्याचा कमी झालेला दर कारणीभूत ठरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा दर 7% कमी झाला होता. अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र अक्षय्य तृतीयेनंतर स्थिरावलेले सोन्याच्या दरात आता वाढ झाली आहे. (अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत देशात तीन वर्षातील विक्रमी सुवर्णविक्री)

आठवड्याभरात सोन्याच्या भावात हजार रुपयांची वाढ झाली आहे. Good₹Returns वेबसाईटनुसार, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे 32,600 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 31,600 आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असताना सोन्याचे भाव वधारल्याने ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे. सोन्यासोबतच चांदीचे भावही काही प्रमाणात वाढले आहेत. Good₹Returns वेबसाईटनुसार, मुंबईत चांदीचा दर किलोमागे 40,250 रुपये इतका आहे. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असून देशाच्या विविध शहरात हे दर वेगवेगळे आहेत.