Gokul Election Results 2021: गोकुळ दूध संघ निवडणूक मतमोजणी; सतेज पाटील गटाची विजयी सुरुवात, सुजीत मिणचेकर, अमर पाटील विजयी, महाडिकांना धक्का
Gokul Dudh Sangh Election Results | (File Photo)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघ निवडणुकीची (Gokul Election Results 2021) आज (4 मे 2021) मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) विरुद्ध सतेज पाटील (Satej Patil) गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. अत्यंत चुरशीच्या अशा या निवडणुकीत सतेज पाटील गटाची सरशी होत असल्याचे प्राथमिक चित्र आहे. सतेज पाटील गटाचे सुजीत मिणचेकर (Sujit Minchekar) आणि अमर पाटील (Amar Patil) हे गोकूळ दूध संघ निवडणूक 2021 मध्ये विजयी झाले आहेत. सुजीत मिणचेकर यांच्या रुपात सतेज पाटील गटाने विजयी वाटचाल सुरु केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुजीत मिणचेकर 346 मतांनी विजयी झाले. तर अमर पाटील हे 436 मतांनी विजयी झाले. मिणचेकर आणि पाटील हे दोन्ही विजयी उमेदवार सतेज पाटील गटाचे आहेत. विशेष म्हणजे या वेळी पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. इतरही निकाल लवकरच हाती येतील.

दरम्यान, गोकुळ दूध संघ निवडणूक मतमोजणीची दुसरी फेरी पार पडली आहे. या फेरीअखेर सुजीत मिणचेकर यांच्या रुपात सतेज पाटील गटाने विजयी सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला सतेज उर्फ बंटी पाटील गटाचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे या वेळी गोकुळ दूध संघात परीवर्तन होईल असे चिन्ह आहे. मतमोजणीकडे अवघ्या कोल्हापूरचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Gokul Election Results 2021: गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल आज होणार जाहीर, कोल्हापूरच्या राजकारणाची किल्ली कुणाकडे? आज फैसला)

दरम्यान, गोकुळ दूधसंघात प्रतिदिन सुमारे 30 ते 35 लाख लिटर दूध संकलन होते. त्यामुळे सहाजिकच दूधसंघाचा विस्तार जिल्हाभर आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दूध वितरीत केले जाते. दूधसंखाचा व्याप मोठा आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या दूधसंघास जिल्ह्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघातच गेल्या काही वर्षात पडला आहे. परिणामी गोकुळ दूधसंघ निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.