मनोहर पर्रिकर (फोटो सौजन्य- ANI)

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे आजारी असणारे गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच मंत्रालयात उपस्थिती लावली आहे. येत्या 29 जानेवारी पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार अल्याने पर्रिकर मंगळवारी मंत्रलायत आले असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकत उपाचार घेऊन परतल्यानंतर पर्रिकर यांनी  मंत्रालयात पाऊल ठेवले नव्हते. अशा स्थितीत ही त्यांनी गेल्या वर्षात अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत उपचार घेतल्यानंतर राहत्या निवासस्थळाच्या येथून कामकाज पाहात होते.

मात्र काँग्रेस पक्षाने पर्रिकर हे आजारी असल्याने प्रशासन ठप्प होत आहे अशी टीका केली होती. तर काहींनी पर्रिकर यांच्या आजारपणाबद्दल माहिती मिळावी यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र आज पर्रिकर यांनी न्यायालयात हजेरी लावली आहे. तसेच त्यांच्यासोबत डॉक्टरांची  टीम पोहचली आहे.