घरकुल घोटाळाः शिवसेना नेते सुरेश जैन यांना 7 वर्षांची तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा
Gharkul Scam ( फोटो फाईल)

जळगाव (Jalgaon) घरकूल घोटाळाप्रकरणी सत्र न्यायालयाने  दोषींना शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे (Shivsena) माजी नेते सुरेश जैन (Suresh Jai) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Rashtrawadi Congress Party) गुलाबराव देवकर (Gulabrao deokar) यांचा समावेश आहे. सुरेश जैन यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर, गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त आरोपी बिल्डर जगन्नाथ वाणी (Jagannath Vani), राजेंद्र मयुर (Rajendra Mayur) यांना 7 वर्षांची शिक्षा आणि 40 कोटींचा दंड, प्रदीप रायसोनीला (Pradeep Raisoni) 5 वर्षांच्या शिक्षेसह 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच साक्षीदार सिंधू विजय कोल्हे (Sindhu Vijay Kolhe) यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाने 48 दोषींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने शनिवारी दुपारी अडीजनंतर या प्रकरणातील सर्व दोषींना शिक्षा जाहीर केली आहे. झोपट्टीतील लोकांना स्वस्त आणि चांगले घरा बांधून देण्यासाठी शंभरहून अधिक कोटींचे कर्ज काढले गेले होते. परंतु 2001 साली या योजनेत घोटाळा झाल्याचेसमोर आले होते. या घोटाळ्यात एकून 52 दोषी आढळून आले होते. त्यापैकी 3 आरोपींचा मृत्यू झाला असून 1 आरोपी फरार आहे. हे देखील वाचा-Lalu Prasad Yadav Health Update: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; किडणी 37 टक्के कार्यरत: मीडिया रिपोर्ट

घरकुल योजना जळगाव नगरपालिकेची होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. घरकुल योजनेअंतर्गत 11 हजार घरे बांधून देण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 110 कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कामाची सुरुवात 1999 मध्ये सुरुवात झाली होती.