Lalu Prasad Yadav Health Update: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; किडणी 37 टक्के कार्यरत: मीडिया रिपोर्ट
Lalu Prasad Yadav | (Photo Credits-Facebook)

Lalu Prasad Health Update: राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav Health) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्यावर झारखंड राज्याची राजधानी रांची येथील रिम्स (RIMS Hospital) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टर डी. के. झा यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी साप्ताहिक मेडिकल बुलेटीन (Medical Bulletin) जारी केले आहे. या मेडीकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, लालू प्रसाद यादव यंची प्रकृती अस्थीर आहे.

बुलेटनमध्ये असेही म्हटले आहे की, लालू प्रसाद यादव यांच्या अंगावर उटलेला एक फोड (पूरळ) फूटन त्याचे रुपांतर मोठ्या जखमेत झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यांना प्रतिजैवकांची (Antibiotic) मात्राही देण्यात येत आहे. रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यांच्यावर नजर ठेऊन असलेल्या डॉक्टरांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, लालू यांच्या रक्तातही इंन्फेक्शन (Infection In Blood) झाल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा रक्तदाब (Blood Pressure) मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. डॉक्टरांनी लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर असल्याचे म्हटले आहे. तसेच, अंगावर उठलेल्या फोडाची जखम झाल्याने त्याच्या माध्यातूनच रक्तामध्ये इंन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच, लालू प्रसाद यादव यांची किडणीही केवळ 50 टक्केच काम करत होती. मात्र, आता ती 37 टक्के काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. लालू प्रसाद यांना झालेले इन्फेक्शन दूर करण्यासाठी त्यांना प्रतिजैवके देण्यात येत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.