घरकुल घोटाळाः शिवसेना नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 आरोपी दोषी
Gharkul Scam ( फोटो फाईल)

जळगाव (Jalgaon) येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाने 48 दोषींना ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच शनिवारी दुपारी अडीजनंतर सर्व दोषींची शिक्षा जाहीर केली जाणार आहे. झोपट्टीतील लोकांना स्वस्त आणि चांगले घरा बांधून देण्यासाठी शंभरहून अधिक कोटींचे कर्ज काढले गेले होते. परंतु 2001 साली या योजनेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या घोटाळ्यात एकून 52 दोषी आढळून आले आहेत. तसेच शिवसेना माजी नेते सुरेश जैन (Suresh Jain) आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao deokar) यांनाही या घोटाळ्यात दोषी म्हणून घोषीत केले आहे.

घरकुल योजना जळगाव नगरपालिकेची होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. घरकुल योजनेअंतर्गत 11 हजार घरे बांधून देण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 110 कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कामाची सुरुवात 1999 मध्ये सुरुवात झाली होती. हे देखील वाचा- धुळे: केमिकल कंपनी स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर

या खटल्यात गुलाबराव देवकर, राजा मयूर (Raja mayur), प्रदीप रायसोनी (pradeep raisoni) आणि जगन्नाथसह (Jagannath) 52 आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील 3 आरोपींची मृत्यू झाला असून एक आरोपी फरार आहे. न्यायधीश सृष्टी निळकंठ (Shrushti Neelkanth) यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले आहे. दरम्यान, या खटल्यातील सर्व  48 संशयित आरोपी हजर होते.