Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai ‘Spa’ Murder Case:   मुंबईतील वरळी परिसरात बुधवारी मध्यरात्री एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. खून झालेला व्यक्ती हा मुंबईतील गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या एका आरोपी पैकी होता. गुरु सिध्दपा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव होते. गर्लफ्रेंडसमोरच वरळी येथील स्पा सेंटरमध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.  या घटनेसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. (हेही वाचा- चुलबुल पांडे यांच्या हत्या प्रकरणी एकाला अटक, वरळीतील घटना

टॅटूतून खुलासे

मिळालेल्या माहितीनुसार, गुरु सिध्दपा यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या अंगावर अनेक टॅटू होते.या टॅटूतून आरोपींचे खुलासे झाले. अगदी गजनी चित्रपटात होते त्याचप्रमाणे, वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवर २०-२२ जणांची नावे गोंदवलेली दिसली. वाघमारे यांच्या घरातून एक डायरी सापडली ज्यात ते कोणाशी भेटले, कोणाचे किती व्यवहार, कोणाशी भांडण अश्या अनेक घटनांची नोंद होती.

आरोपी ताब्यात

पोलिसांनी चौकशीतून या आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यानंतर हत्येचा उघड झाला. अश्या प्रकारने पोलिसांनी आरोपीला अटक केले. वाघमारे यांच्याशी जेव्हा जेव्हा शत्रूसोबत भांडण व्हायचे तेव्हा त्याने त्या व्यक्तीचे नाव आणि मोबाईल नंबर त्यांच्या अंगावर गोंदवून घ्यायचा.पोलिसांनी या प्रकरणातून स्पा सेंटरचे मालक संतोष शेरेगेर,मोहम्मद फिरोज अन्सारी, राजस्थानमधील कोटा येथील साकिब अन्सारी आणि अन्य दोन आरोपींना ताब्यात घेतले.

स्पा सेंटरमध्ये हत्या

घटनेच्या रात्री वाघमारे हे मित्र आणि गर्लफ्रेंडसोबत सायने रेल्वे स्थानकाजवळील अपर्णा बार अॅड रेस्टॉरंटमध्ये गेले होते त्यानंतर वाघमारे आणि त्यांची गर्लफ्रेंड बिल्डिंग, एलआर पापन मार्ग, वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पामध्ये गेले. याच स्पा सेंटरमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.