Accident (PC - File Photo)

पुण्यात गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा टँकर उलटला आहे. यामुळे या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गॅस कॅप्सूल टँकरचा अपघात झाला. गॅस कॅप्सूल टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन उलटून हा अपघात झाला आहे. (हेही वाचा - Hajipur Gas Leak Case: हाजीपूरमध्ये गॅस गळतीमुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती, एकाचा मृत्यू, अनेक जखमी)

टँकर मधील गॅस बाहेर आल्यास आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भारत गॅस कंपनीचा हा टँकर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावर आडवा होता. टँकर दुभाजकाला घासत रस्त्यावर आडवा झाला. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती समोर येत असली तरी वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल देखील घटनास्थळी दखल झाले असून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.