Jalgaon News: जळगावात गॅस सिलिंडरच्या स्फोट, एकाचा होरपळून मृत्यू
Gas Explosion, Death Image (फोटो सौजन्य - Pixabay)

Jalgaon News: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यतील येथील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट (Explosion) होऊन एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. होळीच्या पूर्व संध्येला या घटनेमुळे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दिलीप नामदेव पाटील असं स्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  (हेही वाचा- अलीपूरमधील तेल कारखान्यात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 34 बंब घटनास्थळी हजर

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप पाटील घरात असताना अचानक स्फोट झाला. होळी दहनाच्या सांयकाळी ही घटना घडली. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे संपुर्ण घराला आग लागली होती. आग लागताच घरातील सर्व मंडळी घरा बाहेर पळत गेले. परंतु दिलीप पाटील हे घरात अडकून राहिले. घरात साठवून ठेवलेला कापूस आणि लाकडी छत असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

आग लागताच शेजरच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका सुरुच होता. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग विझवण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर आगीच्या दुर्घटनेत दिलीप यांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने दिलीप यांचा मृतदेह बाहेर काढला. अथक प्रयत्नांनतर आग नियत्रंणात आली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.