प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

राज्यात महिला अत्याचार आणि बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाहीत. राज्यातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना उघडकीस आहेत. यातच नागपूरच्या (Nagpur) माधव नागरी (Madhav Nagri) भागातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रात्री 8 वाजताच्या दरम्यान आपल्या मित्रासोबत रस्त्यावर बोलत उभी होती. त्यावेळी चार आरोपी त्यांच्या जवळ आले आणि पीडिताच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला रस्त्याच्या एका बाजूला घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी नागपूरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. हे देखील वाचा- ट्रेनध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मु्ंबई NCB अधिकाऱ्याला परळी पोलिसांकडून अटक

दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्वरीत तपासाचे चक्र फिवले. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणातील 3 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात माहिती दिली आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागपुरातच काय राज्यभरात महिला कुठेच सुरक्षित नाही आहेत हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्यामुळे पोलीस व्यवस्था ढिसाळ झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.