धक्कादायक! लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात सलग दोन दिवस महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघा आरोपींना अटक एक फरार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: ANI)

कुर्ला परिसरात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात तिघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला 35 वर्षांची असून या नराधमांनी सलग 2 दिवस तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कानपूर येथून आली होती. 21 नोव्हेंबर रोजी ही महिला उड्डाणपुलाखाली जखमी अवस्थेत काही स्थानिकांना आढळली. त्यावेळी त्यांनी त्वरित पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पीडित महिलेला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. धक्कादायक! वाशीमध्ये पुरुषावर 5 जणांचा सामुहिक बलात्कार; पार्श्वभागात नारळाची करवंटी घालून शारीरिक छळ

पोलीस तपासादरम्यान सलग 2 दिवस आपल्यावर या तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत असून अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अशीच एक बलात्काराची घटना मुंबईत घडली. लग्नाच्या बहाण्याने एका 21 वर्षांच्या तरुणीवर 15 वर्षांच्या मुलाने बलात्कार (Rape)  केला. हा आरोप खुद्द पीडित तरुणीने लगावला आहे. या तरुणीच्या आरोपानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्यामध्ये या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,संबंधित प्रकरणी आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड (Juvenile Justice Board) समोर सुनावणी होणार आहे तूर्तास या मुलाची रवानगी बालसुधारगृहात (Child Rehabilation Center) करण्यात आली आहे