बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव शहर पोलीस (Majalgaon City Police) ठाण्यात सामूहिक बलात्काराचा (Gang Rape) गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. या सातही जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. रिक्षा विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका रिक्षा चालकाने या विधवा महिलेला (Gang Rape of Widow Woman) हॉटेलच्या रुमवर बोलावले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. इचकेच नव्हे तर तिने या लैंगिक संबंधांचा व्हिडिओही बनवला. या व्हिडिओच्या माध्यमतून हा रिक्षाचालक आणि त्याचे मित्र असे सातजण मिळून या महिलेला ब्लॅकमेल करत असत. सततच्या अत्याचाराला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा धक्कादाय प्रकार पुढे आला.
सात वर्षे सुरु होता अत्याचार
धक्कादायक म्हणजे पीडितेने तक्रारीत दिलेली माहिती आणि केलेल्या आरोपानुसार सन 2014 ते 2021 अशी एकूण सात वर्षे हा प्रकार सुरु होता. हे आरोपी पीडितेला वाट्टेल तेव्हा बोलवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत असत. तिच्याकडून ओरबडून शरीरसुख घेत असत. सततच्या त्रासाला कंटाळून आणि हतबल झालेल्या पीडितेने अखेर पलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. या प्रकरणी माजलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (हेही वाचा, Mumbra Crime: घरी जाण्यास नकार दिल्याने पतीची पत्नीला अमानुष मारहाण, महिलेचा मृत्यू)
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, सन 2014 मध्ये प्रवास करत असताना पीडितेची पर्स संदीप पिंपळे यांच्या रिक्षात विसरली होती. या वेळी विसरलेली पर्स देण्याच्या बहाण्याने पिंपळे याने पीडितेला बीड शहरातील कबाड गल्लीतील एखा खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराचा त्याने व्हिडिओही बनविला. त्यानंतर तो तिला सातत्याने धमकी देत तिला ब्लॅकमेल करत राहिला. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने त्याचा नातेवाईक असलेल्या गोरख इंगोले यालाही पीडितेसोबत शरीरसंबंध प्रस्तापीत करण्यास बळजबरीने भाग पाडले. पुढे गोरख इंगोले यालाही चटक लागली. तोही पीडितेला ब्लॅकमेल करु लागला.
अत्याचार वाढतच गेला
आता संदीप पिंपळे आणि गोरख इंगोले यांची मजल पुढे पोहोचली होती. गोरख इंगोले याने पीडितेला दुचाकीवर बसवून जरुड ते हिवरा पहाडी रोडवर असलेल्या घाटात नेले. तिथे आपल्या चार मित्रांना बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे हे चौघे जण तिच्यावर सलग सहा तास बलात्कार करत होते. ही घटना 2020 मध्ये घडली. दरम्यान, आरपींच्या त्रासाला कंटाळून पीडिता गाव सोडून माजलगाव येथे राहण्यास आली. तिथे तिने चरीतार्थ चालविण्यासाठी हॉटेलमध्ये नोकरी पत्करली. पण आरोपी थांबले नाहीत. त्यांनी तिथेही येऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर पीडतेने पोलिस स्टेशन गाठले आणि सात जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.