Gandhidham Puri Express Fire | (Photo Credit - Twitter)

नंदूरबार रेल्वे स्टेशन ( Nandurbar Railway Station) जवळ गांधीधाम पुरी एक्सप्रेसला (Gandhidham Puri Express) आज (29 जानेवारी) अचानक आग लागली. नंदूरबार (Nandurbar) स्टेशनमध्ये पोहचण्यास काहीच अवधी असताना ट्रेनला अचानक आग लागली. आग भीषण असल्याने ट्रेनमधील प्रवाशी आणि ट्रेनबाहेर परिसरातील नागरी मोठ्याने आरडाओरडा करु लागले. स्टेशन जवळ येत असल्याने एक्सप्रेसचा वेग कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. तोपर्यंत अग्निशमन दलाला घटनेची माहिती पोहोचली होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचल्या. काही वेळातच आग आटोक्यात आली.

दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच ट्रेनमधील प्रवासी जीवाच्या अकांताने आरडारोडा करु लागले. लहान मुले, स्त्रिया घाबरुन गेल्या. आग भिषण असल्याने धुराचे लोट हवेत उडत होते. रेल्वेचे डबे आणि परिसरातही धुर झाल्याने काही प्रवाशांना श्वसनास त्रास झाला. प्रवाशांना प्रसंगावधान राखून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ट्रेनचे मात्र मोठेच नुकसान झाले.

गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकले नाही. रेल्वे स्टेशन जवळच असल्याने ही आग आटोक्या आणली गेली. मात्र प्रवासारदम्यान रेल्वेला आग लागल्यास ती नियंत्रणात आण्याचे कोणतीही उपाययोजना रेल्वेकडे नसल्याचे या अपघातामुळे पुढे आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी हा आग आटोक्यात आणली. (हेही वाचा, Fire At Mumbai Airport: मुंबई विमानतळावर दुर्घटना थोडक्यात टळली, Air India कंपनीच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनास आग (WATCH VIDEO))

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, रेल्वेच्या पॅन्ट्रीमध्ये डब्याला आग लागल्याचे प्रथम पुढे आले. या डब्यात जेवणाचे साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर आवश्यक साहित्य असते. याच डब्यात आग लागल्याने ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग पाहता पाहता वाढत गेली. आगीने रौद्ररुप धारण केले. ज्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणावह हादरुन गेले.