Martyr Sachin More (Photo Credits: Twitter/Supriya Sule)

भारत चीन सीमारेषेवरील (India- China Border) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) महाराष्ट्रातील मालेगाव (Malegaon) चे सुपुत्र जवान सचिन मोरे (Sachin More) यांना वीरमरण आल्याची दुःखद माहिती समोर येत आहे.शनिवारी 27 जून रोजी सचिन मोरे यांचे पार्थिव मालेगाव येथील मोरेवाडी साकुरी या मूळगावी पोहचणार आहे.  प्राप्त माहितीनुसार, गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आणि चीन मध्ये सुरु असणारा संघर्ष लक्षात घेता एका नदीवर पुलाच्या उभारणीचे काम सैन्याच्या एका तुकडीवर सोपवण्यात आले आहे. आज नदीवरील पुलाचे काम करताना 2  जवान नदीच्या वाहत्या प्रवाहात पडले, त्यांना वाचवण्यासाठी मोरे यांनी सुद्धा नदीत उडी घेतली. या दोन्ही जवानांचे प्राण तर वाचले मात्र उडी मारली असताना डोक्याला दगड लागल्याने सचिन यांना जबर जखम झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सचिन मोरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray),सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .

मुख्यमंत्री कार्यालयातून सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहताना मायभूमीची सेवा, रक्षण हेच परम कर्तव्य! यात मृत्यूची ती काय तमा हे मोरे यांनी पटवून दिल्याचे म्हणत त्यांच्या शौर्याचे कौतुक केलेले आहे. तर सुप्रिया सुळे यांनी सचिन यांच्या परिवाराचे सांत्वन करत त्यांना आधार दिला आहे. India-China Tensions: गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर लद्दाख मध्ये आभाळात घिरट्या घालताना दिसलं वायुसेनेचं लढाऊ विमान (Watch Video)

CMO ट्विट

सुप्रिया सुळे ट्विट

दरम्यान, सचिन मोरे हे मालेगाव मधील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील सुपुत्र आहेत, भारतीय सैन्यात ते इंजिनिअर म्हणुन दाखल झाले होते. सचिन यांच्या मागे आई वडील, पत्नी, दोन मुली, दोन भावंडंं आणि एक सहा महिन्याचा चिमुकला सुद्धा आहे.