महाराष्ट्रात (Maharashtra) अटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. यामुळे राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एवढेच नव्हेतर, गेल्या अनेक महिन्यानंतर उघडण्यात आलेले मंदिरे पुन्हा एकदा बंद होऊ लागली आहेत. यातच औरंगाबाद (Aurangabad) येथील गारखेडा (Garkheda) परिसरातील गजानन महाराजांचे मदिर (Gajanan Maharaj) पुढील सात दिवस बंद येणार आहे. गजानन महाराज प्रकट दिन गेल्या 40 वर्षांपासून या मंदिरात साजरा केला जातो. मात्र. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गजानन महाराज यांचा प्रकट दिन यावर्षी 5 मार्चला साजरा केला जाणार होता. दरवर्षी महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. दरम्यान, लोकांची गर्दी वाढली तर, कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. परंतु, शहरात सध्या कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा- CSMT बनले महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक; IGBC कडून मिळाले सुवर्ण प्रमाणपत्र
महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. राज्यात काल (3 मार्च) 9 हजार 855 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 6 हजार 559 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 20 लाख 43 हजार 349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82 हजार 343 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.