महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. 7 सप्टेंबर पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. दरम्यान गजानन काळे यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. सध्या नेरूळ पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पत्नीने पोलिसांत धाव घेतल्यापासून गजानन काळे फरार आहेत. सौ. काळे यांनी या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन सारा प्रकार त्यांना सांगितला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे मारहाण करत होते अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे. सोबतच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केल्याने प्रकरण नाजूक झाले आहे. गजानन काळे आणि संजीवनी काळे हे 2008 साली विवाहबद्ध झाले आहेत.
दरम्यान गजानन काळे हे फरार आहेत. नवी मुंबई पोलिसांची 10 पथकं त्यांचा शोध घेत आहेत. गजानन काळेंवर गुन्हा दाखल असल्याने आता पोलिसांना देखील त्यांचा शोध घेण्याचं आव्हान आहे. काळेंचा फोन स्वीच ऑफ आहे. अद्याप मनसे कडून त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही पण भाजपाच्या चित्रा वाघ यांनी आपण संजीवनी काळे यांंच्या मागे उभ्या असल्याचं म्हटलं आहे.