कामशेत येथे मासेमारी करणाऱ्या एका मच्छिमाराला पावना धरणात एक विचित्र आकाराचा मोठा मासा सापडल्याची घटना घडली आहे. शनिवारी सापडलेल्या माश्याचे तोंड हे सुसरीसारखे असून पाठील अंग माश्याप्रमाणे असल्याचे मच्छिमाराने सांगितले आहे.
पावना धरणात सापडलेला सुसर (Alligator Gar) जातीतील मासा हा बहुदा उत्तर अमेरिकेत (North America ) येथे आढळून येतो. त्यामुळे मत्सविभागाने या माशाचे अधिक संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. सुसरीसारखा हा मासा माणसांना भक्ष करुन त्यांना खातो, तर इतर माशांची अंडीसुद्धा खातो असे सांगण्यात येत आहे.हा मासा विषारी असून माणसांसाठी जीवघेणा ठरतो. तर धरणाशेजारी असणाऱ्या फार्म हाऊसजवळ असणाऱ्या पूल मध्ये तो असल्याची भीती आधी बाळगली जात होती. मात्र तो धरणात असल्याचे कळल्यावर मच्छिमारांनी त्याला धरणातून बाहेर काढले आहे.
मत्सविभागाचे अधिकारी महेश यांनी कामशेत येथील धरणाला भेट देऊन या माशाची पाहाणी केली आहे. तर या माशाचा तपास करताना हा एक भलामोठा मासा असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सुसरीसारखा दिसणारा या माश्याचे दात टोकदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.