प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे संकट गडद होत असताना गडचिरोली (Gadchiroli) येथील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डोंगरसावंगी येथे अंगावर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारी 2 च्या सुमारास घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यश गेणूदास राऊत (16) असे मृतकाचे, तर मनिष किशोर राऊत (15) असे गंभीर जखमीचे नाव आहेत. कोरोनामुळे शाळेला सुट्टी असल्याने हे दोघेही आपल्या नातेवाईकांच्या शेतावर ये-जा करत होते. सदर घटनेने वडधा आणि डोंगरसावंगी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश आणि मनीष हे दोघे चुलत भाऊ आज दुपारी रोणीकरीता बांध्यात पेढ्या टाकत होते. दरम्यान, अचानक विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे यश आणि मनीष या दोघांनीही शेतातील किन्हीच्या झाडाचा आसरा घेतला आहे. मात्र. ज्या झाडात आसऱ्याला हे दोघे उभे होते. नेमके त्याच झाडावर वीज कोसळली. या घटनेत यश जागीच ठार झाला आहे. तर, मनीष गंभीर जखमी झाला आहे. मनीष याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. यश आणि दोघेही वडधा येथील किसान विद्यालयात शिक्षण घेत होते. हे देखील वाचा- Lockdown In Mumbai: मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, 100 टक्के लॉकडाऊनची गरज नाही; महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती

ट्वीट-

गडचिरोलीत याआधी वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी 3 जुलै रोजी घडली असून मृत महिला शेतात कापसाची पेरणी करून घरी परतत असताना तिच्या अंगावर वीज कोसळली होती. संगीता टीकाराम मडावी असे मृत महिलेची नाव आहे.