आज (बुधवार, 20/2/2019) राज्यभरातील तब्बल 500 पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल पंप आज 20 मिनिटे बंद राहतील.
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे (FAMPEDA) अध्यक्ष उदय लोध (Uday Lodh) यांनी सांगितले की, "सीआयपीडी (CIPD) चे सर्व पेट्रोल पंप आज संध्याकाळी 20 मिनिटं बंद राहतील. या सर्व पेट्रोल पंपवर बॅनर आणि फोटो लावून तिथले दिवे संध्याकाळी 7 ते 7:20 या दरम्यान बंद करण्यात येतील. तर दोन मिनिटं मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येईल." 'भारत के वीर' या अॅप किंवा वेबसाईटवरुन शहीदांच्या कुटुंबियांना अशी करा आर्थिक मदत
भारतीय सैन्याबद्दल असलेला आदर आणि ऐक्य दाखवण्यासाठी आणि शहीद जवानांच्या कुटुंबांना आधार देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या दरम्यान पेट्रोल पंपावर गर्दी करु नका. ग्राहकांनी त्यापूर्वी पेट्रोल-डिझेल भरुन घ्यावे, असे आवाहन लोध यांनी केले आहे.(पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी SBI ची नवी सुविधा)
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतावाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले असून 100 तासांच्या आत हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला.