ओल, उबर संप: २० ते २५ लोकांकडून रेल रोको; सात मिनीटांत सेवा पूर्ववत
(Archived, edited, representative images)

Ola, Uber issue : ओला(Ola), उबर (Uber)चालकांनी संप मागे घेतला असताना आज (मंगळवार, २० नोव्हेंबर) २० ते २५ जणांच्या समूहाने दादर येथे रेल रोको केला. त्यामुळे रेल्वे ७ मिनीटे उशीरा धावली. मात्र, रेल्वे पोलिसांनी रेल रोको करणाऱ्या जमावास रुळावरुन हटवले आणि रेल्वेसेवा पूर्ववत सुरु झाली. या समूहातील लोक महाराष्ट्र राज्य कामगार संघातील असल्याचे समजते. ओला, उबर चालकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या लोकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, ओला,उबर चालकांनी आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी संप पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा संप सोमवारी (१९ नोव्हेंबर) मागे घेण्यात आला.

ओला, उबर चालक-मालकांच्या मागण्या

  • एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १६ रुपये,
  • एसी सदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १८ रुपये
  • एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान १०० ते १५० रुपये भाडेदर निश्चित (fixed fare ) ठेवावे
  • प्रत्येक कॅब चालकाचा दिवसाला किमान ३००० रुपयांचा व्यवसाय व्हायला हवा

(हेही वाचा, Ola, Uber चा संप मिटला, देवेंद्र फडणवीस यांचे मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन)

दिवाळीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने ओला, उबर टॅक्सीचालकांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले होते. रविवारी (१८ नोव्हेंबर) मध्यरात्रीपासून ओला, उबर टॅक्सीचालक संपावर गेले होते. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरातील ओला, उबर टॅक्सी चालक, मालक संपावर गेले होते.