Night Power Block: शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा राहणार बंद
मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी येथून कसाराकडे जाणारी रात्री 12.14 ची लोकल अखेरची असेल. त्यानंतरच्या कर्जत व ठाणे या दोन्ही गाड्या रद्द असतील. त्यामुळे कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. प्लॅटफॉर्म विस्तारासाठी मध्य रेल्वेने आजपासून दोन दिवस शुक्रवार- शनिवार रात्रकालीन विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहे. (हेही वाचा -  MegaBlock on Sunday: रविवारी 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा)

शनिवारी रात्री 12.30 नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतूक पहाटे साडे चार वाजेपर्यत पुर्णपणे बंद राहणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार/शनिवार रात्री चार तासांचे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. शुक्रवारी हा ब्लॉक भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर असणार आहे. तर शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर आणि वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक पूर्वी (शेवटच्या लोकल)

सीएसएमटी -कसारा रात्री 12.14

कल्याण-सीएसएमटी रात्री 10.34 सीएसएमटी-पनवेल रात्री 12.13

पनवेल-सीएसएमटी रात्री 10.46

ब्लॉक नंतर (पहिल्या लोकल)

सीएसएमटी-कर्जत पहाटे 4.47

ठाणे-सीएसएमटी पहाटे 4

सीएसएमटी-पनवेल पहाटे 4.52

सीएसएमटी-बांद्रा पहाटे 4.17