दुष्काळग्रस्तांना फुकटात मोबाईलचा रिचार्ज मिळणार असल्याच्या अफेवर शरद पवार यांचा खुलासा
शरद पवार (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यातील काही भागात अद्याप दुष्काळाची परिस्थिती आहे. तर पुरेसा पाऊस न पडल्याने पाणी टंचाईची समस्या कायम आहे. त्यातच आता राज्यातील दुष्काळग्रस्तांना फुकटात मोबाईल रिचार्ज मिळणार असल्याचा एक मेसेज सध्या फिरत आहे. यावरुन राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक ट्वीट करत ही अफवा पसरवली जात असल्याचा खुलासा केला आहे.

पीडित शेतकऱ्यांना फुकटात रिचार्ज देण्यात येणार असल्याचा मेसेजचा प्रकार अत्यंत निंदनीय असून त्याबद्दल शरद पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियावरील हा मेसेज फक्त एक अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पवार यांनी केले आहे. तसेच ही अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यासोबत ही पीडितांची चेष्टा केली असल्याचे पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

(राजू शेट्टी यांचं महाआघाडी बद्दल मोठं विधान; राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा समावेश असेल तरच महा आघाडीमध्ये येणार)

मात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांना माझ्याकडून मोबाईल रिचार्ज करुन देण्यात असा मेसेज शरद पवारांच्या नावाने फिरत होता. याबद्दल पवार यांना समजताच हे सर्व खोटे असून त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर सायबर गुन्हे शाखेने व्हायरल झालेल्या या मेसेजसंबंधित तपास करुन त्यांच्यावर कारवाई करावी असे पवार यांनी म्हटले आहे.