Fraud case against Maruti Navale: सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारूती नवले यांच्या विरोधात फसवणूकीचे आरोप; PF ची रक्कम लाटल्याचे आरोप
Representational Image (File Photo)

सिंहगड इन्स्टिट्यूटचे (Sinhagad Institute) संस्थापक मारुती निवृत्ती नवले (Maruti Navale) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशन (Kondhava Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 166 कर्मचार्‍यांच्या पीएफ च्या निधीमध्ये अपहार केल्याचा त्याच्याविरूद्ध आरोप आहे. ऑक्टोबर 19 ते जून 22 या कालावधी दरम्यान हा प्रकार कोंढवा येथील टिळेकर नगरमध्ये असलेल्या सिंहगड सिटी स्कूलमध्ये घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राहुल एकनाथ कोकाटे यांनी तक्रार केली असून कोकाटे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी पदावर आहेत. त्यांच्या तक्रारी नुसार कर्मचार्‍यांच्या पगारातून ऑक्टोबर 19 ते ज22 पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे. 74 लाख 68हजार 636 रुपयांची एकूण कपात करून घेतलेली होती. परंतु, यातील फक्त तीन लाख 75 हजार 774 रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आल्याचा दावा आहे. उरलेले 70 लाख 92 हजार 862 रुपयांचा भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. PF Balance Check: आता UAN नंबरशिवाय चेक करू शकता तुमचा पीएफ बॅलन्स; 'या' सोप्या स्टेप्सद्वारे घ्या जाणून .

कोकाटे यांनी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावरून कोंढवा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मारुती नवले यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूट ही नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे पण आता या फसवणूकीच्या आरोपांनंतर तपास यंत्रणांच्या रडार वर आली आहे.