Akola Crime: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, तक्रारानंतर आरोपी फरार, अकोल्यातील घटना
Representational image (Photo Credit- IANS)

Akola Crime: दिल्लीतील एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, पीडितेवर 3 वर्षापासून अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार नोंदवला आहे. एका हॉटेलमध्ये पीडितेला नेत तिच्यासोबत अनेकदा शारिरीक संबंध प्रस्थापित केले, असं पीडित तरुणीने पोलिसांता तक्रारीत म्हटलं आहे.  (हेही वाचा- ICU मध्ये उंदीर चावला त्यामुळे रुग्ण दगावला

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकिय तपासणी केली त्यानंतर आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मोहसीन इब्राहिम सुर्या (वय ३५) असं आरोपीचे नाव आहे. तरुणी ही मुंबईला काही कामासाठी गेली होती त्यावेळी तीची ओळख अकोल्यातील मोहसीनशी झाली. दरम्यान अनेक भेटी गाठी वाढल्या. दोघांची चांगली मैत्री झाली. कालांतरानं त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षांपासून दोघांचे प्रेम संबंध सुरुच होते. त्यानंतर मोहसीनने तिला लग्नाचे वचन दिलं होते.

त्यानंतर मोहसीनने पीडितेला अकोल्यात आणलं आणि शहरातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये तिला ठेवलं. तिथे तीच्यावर शारिरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसानी ती दिल्लीला निघून गेली. पुन्हा मोहसीनने तीला अकोल्यात बोलावून घेतलं. हे असचं सुरु होते. पीडितेने मोहसीनकडे लग्नाची मागणी घातली. अनेकदा लग्नासाठी त्याने दुर्लक्ष केले. असंच काही वेळ सुरुच होत. त्यानंतर त्याने तिला स्पष्टच नकार दिला. आरोपीच्या वागणूकीला  कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार नोंदवला.

पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार केल्यापासून आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस त्याच्या शोधात आहे. पोलिसांनी आरोपीवर  376, 376(2N), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.