उल्हासनगर (Ulhasnagar) शहरातील कॅम्प एक भागात असलेल्या मोहिनी पॅलेस (Mohini Palace) या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब शनिवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. टेरेसचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत आल्याने इमारतीमधील 15 नागरिक यात अडकले होते. यातील 11 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच ढिगाऱ्याखाली आणखी चार ते पाच जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिकेचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. बचावकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडील ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) (1 जीप, 1 पिकअप, 15 जवान) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) दाखल झाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra: देशी दारुचा काढा देत 50 रुग्णांची कोरोनावर मात, डॉक्टरचा अजब दावा ऐकून प्रशासनाने धाडली नोटीस
एएनआयचे ट्विट-
#UPDATE | Four people including a 12-year-old child die as part of a building collapses in Ulhasnagar, Thane; one person missing: Thane Municipal Corporation
— ANI (@ANI) May 15, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत अनधिकृत आहे. तसेच या इमरतीचे बांधकाम 1994 मध्ये पूर्ण झाले होते. परंतु, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.