Latur Accident: महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील महामार्गावर ट्रॅक्टर - ट्रॉलीची धडक कारला लागल्याने चार जण जागीच मरण पावले आहे. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. या अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. बराच वेळाने पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली. या अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात महालंग्रा गावाजवळ घडून आला. ( हेही वाचा- बुलंदशहरमध्ये कार कालव्यात पडली, 3 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता)
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात लातूर-नांदेड महामार्गावरील महालंग्रा गावाजवळ पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडला. कार मधील प्रवाशी तुळजापूर येथील मंदिरात जात असताना अपघात घडला अशी माहिती मिळाली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक कारला लागली आणि भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळी येऊन कारमधील अडकलेल्यांना बाहेर काढले आणि मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
कारमधील मोनू बालाजी कोतवाल (27), शिवराज हरिश्चंद्र लंकाधाई (26), कृष्णा मांडके (24) आणि नरमन राजाराम कात्रे (33) हे जागीच ठार झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे संपुर्ण नुकसान झाले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. शुभम लंकाधाई या अपघाता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे सर्व जण नांदेड येथील रहिवासी होते.