NCP ला आणखी एक धक्का, धनंजय महाडीक भाजपात प्रवेश करणार
Dhananjay Mahadik (Photo Credits-Twitter)

कोल्हापूर (Kolhapur) मधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे माजी खासदार धनंजय महाडीक (Dhanjay Mahadik) भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच भाजपात प्रवेश करण्याबाबत महाडीक यांनी काही कारणे सुद्धा स्पष्ट केली आहेत. यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक भगदाड पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कामाशी प्रभावित होऊन आणि राष्ट्रवादी पक्षाकडून काही प्रतिसाद न मिळाल्यान भाजपात प्रवेश करणार असल्याची भुमिका महाडिक यांनी मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपात जाण्याची काही कारणे सांगितली आहेत. महाडीक यांनी लोकसभेत पाच वर्ष मतदारसंघात काम केले. तसेच खासदार पदाचा सुद्धा कारभार सांभाळला.

परंतु 2019 मधील लोकसभा निवडणूकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रयत्न करुन सुद्धा स्वकियांकडून मदत मिळाली नाही. यामुळे भाजपात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे महाडीक यांनी सांगितले.(चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर टिका; म्हणाले, शरद पवारांची ही शेवटची धडपड)

त्याचसोबत मतदारसंघाचा विकास, कामे करुन घेण्यासाठी सुद्धा भाजपात जात असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु राष्ट्रवादी सोडताना शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या सोबत माझे कोणतेही वाद नसल्याचे ही महाडीक यांनी म्हटले आहे.