Police officer Alex Fialho Passes Away:  पोलीस अधिकारी अॅलेक्स फियालोह यांचे निधन, सीरियल किलर रमन राघव याच्या मुसक्या आवळ्याने आले होते चर्चेत
Police officer Alex Fialho Passes Away | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलीस दलाचे माजी अधिकारी (Former Mumbai Police Officer) अॅलेक्स फियालोह (Alex Fialho ) यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1968 मध्ये थरकाप उडवून देणारा सीरियल किलर रमन राघव ( Serial Killer Raman Raghav) याच्या मुसक्या आवळण्यात फियालोह हे यशस्वी झाले होते. त्यांच्या कामाचे राज्यभर कौतुक झाले होते. (Alex Fialho Passes Away ) मुंबई पोलीस दलाने Alex Fialho यांची कामगिरी पाहून त्यांना त्या वेळी 1000 रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. तसेच त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले. पुढे पदोन्नती होत होत ते सहाय्यक पोलीस आयुक्त पदापर्यंत पोहोचले आणि निवृत्त झाले.

साधारण 1968 मध्ये अवघी मुंबई दहशतीखाली होती. एका सीरियल किलरने ही दहशत माजवली होती. रमन राघव (Raman Raghav) असे या सीरियल किलरचे नाव. या किलरने पुरुष, स्त्रीया आणि लहान मुले अशा एक-दोन, दहा-बारा नव्हे तर तब्बल 41 जणांची हत्या करुन मुंबईमध्ये थरकप उडवून दिला होता. अवघी मुंबई दहशतीच्या छायेत होती. या सीरियल किलरपर्यंत पोहोचने हे एक मोठेच आव्हान मुंबई पोलिसांसमोर होते. अकेर कसून शोध करत रमन राघव या सीरियल किलर पर्यंत पोहोचण्यात मुंबई पोलिसांना यश आले. या गुन्हेगाराला पकडण्यात अॅलेक्स फियालोह यांचा वाटा मोठा होता. (हेही वाचा, धक्कादायक! अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खतरनाक Serial Killer; हस्तमैथुन करत आतापर्यंत केली 93 महिलांची हत्या)

असा लागला छडा

Alex Fialho हे एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष अधिकारी होते. एके दिवशी मुंबई येथील डोंगरी परिसरात स्वच्छ सुर्यप्रकाश असताना एक व्यक्ती भीजलेली छत्री घेऊन निघाला होता. Alex Fialho यांनी जाऊन त्या व्यक्तिच्या खांद्यावर हात ठेवला. हा व्यक्ती सीरियल किलर रमन राघव होता.

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक 'अनुराग कश्यप' यांनी रमन राघव याच्यावर एक चित्रपटही बनवला आहे. या चित्रपटात रमन राघव यांची भूमिका नावजुद्दीन सिद्धीकी याने केली आहे. इतक्या वर्षानंतरही रमन राघव हा सीरियल किलर अनेक मुंबईकरांच्या मनात धडकी भरवतो.