Sanjay Pandey PC TWITTER

Sanjay Pandey: मुंबईचे  माजी पोलिस आयुक्त आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी संजय पांडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची राजकारणात धमाकेदार एन्ट्री झालेली आहे. संजय पांडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत सर्वांचे लक्ष लागून होते. त्यांनी काल क्रॉंगेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आता ते मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा- माजी पोलिस आयुक्त Sanjay Pandey विधानसभा निवडणूक लढणार, वर्सोवा विधानसभा मतदार संघातून लढण्याची शक्यता)

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय पाडे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. संजय पांडे यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. संजय पांडे यांनी गेल्या महिन्यांत फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यातून ते राजकारणात उतरणार होते असा संकेत दिसून आला होता. पण कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढणार याबाबत काहीच लिहलं नव्हतं.

कॉंग्रेस पक्षात प्रवेश

संजय पांडे यांना झाली होती अटक 

संजय पांडे यांनी IIT कानपूर येथून पदवी घेतली आणि त्यांनी 1986 बॅचचे IPS  अधिकारी झाले. 18 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. पांडे यांना सप्टेंबर 2022 मध्ये सीबीआयने एका फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना दिल्ली कोर्टाकडून जामिन मिळाला होता.