Sadabhau Khot Tests Positive For COVID-19: माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण
Sadabhau Khot (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सर्वसामन्यांपासून तर अनेक राजकीय नते, बॉलिवूड कलाकार, खेळाडू यांसह बरेच जण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच रयत क्रांतीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना कोरोनाची लागण झाली आहे. खोत यांनी स्वत: याबाबत फेसबुकवरून माहिती दिली आहे. सदाभाऊ यांनी स्वत: याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे

“माझा कोव्हिड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी क्वारंटाईन झालो आहे. मी आता उत्तम आहे. आपणही आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गणरायाच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन. धन्यवाद”, अशी पोस्ट सदाभाऊ खोतयांनी फेसबूकवर केली आहे. त्यांनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या 17,931 रुग्णांवर उपचार सुरु; आतापर्यंत तब्बल 1,11,967 रुग्ण झाले बरे

सदाभाऊ खोत यांची फेसबूक पोस्ट-

महाराष्ट्रात मंगळवारी संध्याकाळी 10 हजार 425 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. तर, 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 3 हजार 823 वर पोहचली आहे. तर राज्यात मृतांचा एकूण आकडा 329 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात 12,300 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 5,14,790 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.