कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; राज्यातील मृतांच्या वाढत्या संख्येवर केली चिंता व्यक्त
BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहले आहे. राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या (COVID19 Tests In Mumbai) मात्र 50 टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात कोरोनाबळींची संख्याही झपाट्याने वाढत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे. असे केले तरच कोरोनाच्या वादळापासून आपली सुटका लवकर होणे शक्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

1 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 56 टक्के होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या. 15 मे 2020 रोजी हे प्रमाण 40.5 टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता 31 मे 2020 रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे 27 टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणार्‍या चाचण्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी आहेत. मात्र, 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ 3500 ते 4000 चाचण्याच केवळ मुंबईत होत आहेत, असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच 27 मे 2020 रोजी त्या कालखंडापर्यंतच्या सर्वाधिक 105 बळींची नोंद झाली होती. 29 मे 2020 रोजी ही संख्या 116 वर पोहोचली आणि आता काल, 3 जून 2020 रोजी तर 122 बळी असा नवीन उच्चांक स्थापित झाला. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर, आतापर्यंतचे सर्वाधिक 64 बळी 30 मे रोजी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकी 49 बळी एकट्या मुंबईत आहेत, असेही फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- MMR अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना आंतरजिल्हा प्रवासास बिनशर्थ परवानगी; जाणून घ्या MMR Region म्हणजे नेमके काय?

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात बुधवारपर्यंत 74 हजार 860 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.