अखेर दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर, महाराष्ट्रात #MissionBeginAgain सुरु झाले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे राज्यात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते, आता यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे व याबाबत राज्य सरकारकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, मुंबई महानगर प्रदेश (MMR) अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींच्या आंतरजिल्हा प्रवासाला, कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने हा आदेश जारी केला आहे. अशाप्रकारे आता मुंबईमध्ये प्रवासाला परवानगी दिली आहे.
राज्य शासनाने आज जारी केल्या आदेशानुसार, बाहेर व्यायाम करण्यास परवानगी दिली गेली आहे. तसेच दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुढे मुंबई महानगर प्रदेशाच्या हद्दीत ज्या महानगरपालिका येत आहेत, तिथल्या नागरिकांच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिली आहे. याआधी पासशिवाय आंतर-जिल्हा प्रवास करता येत नव्हता.
एएनआय ट्वीट -
Inter-district movement of persons within the area of Municipal Corporations under the #Mumbai Metropolitan Region (MMR) will be allowed without any restrictions: Government of Maharashtra pic.twitter.com/yHnqmPxNgt
— ANI (@ANI) June 4, 2020
तर जाणून घेऊया मुंबई महानगर प्रदेश नक्की कोणता आहे
मुंबई महानगर प्रदेश (MMR) हा मुंबई महानगर आणि तिथली उपनगरे यांना एकत्रित संबोधले जाते. इथली उपनगरे गेल्या वीस वर्षात विकसित झाली असून त्यात 8 महानगरपालिका आणि 9 नगर परिषद आहेत. मुंबई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (MMRDA), नियोजन, विकास, वाहतूक आणि घरे इ. अशा विविध प्रकारे या संपूर्ण भागाची देखभाल केली आहे. हे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेद्वारे मुंबई शहराशी जोडलेले आहे. (हेही वाचा: मुंबईच्या धारावी परिसरामध्ये 24 तासांमध्ये 23 नवे रूग्ण; एकूण Covid 19 च्या रूग्णांची संख्या 1872)
समाविष्ट असलेले प्रदेश –
मुंबई महानगर प्रदेशाचे क्षेत्र सुमारे 4355 चौ.कि.मी. असून त्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार आणि मिरा भाईंदर या 8 महानगरपालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, माथेरान, कर्जत, पनवेल, खोपोली, पेण, उरण व अलिबाग या 9 नगरपरिषदा तसेच ठाणे व रायगड जिल्हयांतील 1000 चे वर खेडी यांचा समावेश आहे. हे सर्व परिसर मुंबई शहर (पूर्ण), मुंबई उपनगर (पूर्ण), ठाणे (काही प्रमाणत), पालघर (काही प्रमाणत) व रायगड (काही प्रमाणत) जिल्ह्यांच्या हद्दीद येतात.
अशाप्रकारे आज शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, या परिसरात आंतर-जिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली आहे.