Coronavirus in India (Photo Credits: PTI)

मुंबई शहरामध्ये मागील अडीच महिन्यांपासून वाढत असलेलं कोरोनाचं संकट आता आटोक्यात येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्यात मुंबई शहरातील हॉट्स्पॉट्सपैकी एक असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर होतं. आता त्यालाही यश मिळालं आहे. आज मागील 24 तासांत मुंबईच्या धारावीमध्ये 23 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकदा 1872 इतका झाला आहे. दर एकूण मृत्यूमुखी पडल्याचा आकडा 71 पर्यंत पोहचल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धारावी परिसराचा आढावा घेतला. दरम्यान या ठिकाणी रूग्णांचा डबलिंग रेट 30 दिवसांपर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे. Unlock 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील; दुकानं, जीम, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांसदर्भात नवी नियमावली जारी.

पालिका प्रशासन आणि राज्य सरकार यांनी एकत्रित मिळून धारावी सारख्या दाटीवाटीच्या भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात क्वारंटीन सेंटर्स उभारली होती. धारावीमध्ये नागरिकांना होम क्वारंटीन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान आता माहीम नेचर पार्कमध्ये तात्पुरते कोव्हिड सेंटरदेखील उभारण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी तिथल्या तिथे दाखल करणं सुकर झाले आहे. दरम्यान धारावीमध्ये एका उमद्या पोलिस ऑफिसरने देखील आपला जीव कोरोना संकटामध्ये गमावला आहे.

ANI Tweet

Gujarat Bharuch Blast: गुजरात मधील भरूच भागातील केमिकल कंपनीला आग; ५ जणांचा मृत्यू, ५२ जखमी - Watch Video 

महाराष्ट्रामध्ये काल (3जून) दिवशी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे2500 पेक्षा अधिक रूग्ण 24 तासांत आढळल्याची माहिती दिली होती. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 74 हजार 860 च्या पार गेला आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.