Devendra Fadnavis government Inquiry about Planting the tree (PC - twitter)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात केलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची (Planting the Tree) चौकशी (Inquiry) होणार आहे. वनमंत्री संजय राठोड (Forest Minister Sanjay Rathod) यांनी बुधवारी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वृक्ष लागवडीच्या ईश्वरीय कार्याबाबत कोणी शंका घेत असल्यास ते योग्य ठरणार नाही, असं माजी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वनमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वृक्ष लागवड योजना राबविली होती. मात्र राज्यातील काही ठिकाणी या वृक्ष लागवडीत अनियमित्ता झाल्याच्या तक्रारी काही आमदारांनी वनमंत्र्यांकडे केल्या होत्या. यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्या मतदार संघात वृक्षलागवडीमध्ये अनियमत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा - कर्नाटक विधानसभा निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरण: संभाजी भिडे यांना बेळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर)

वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे राज्यात वृक्ष लागवडीमध्ये अनियमत्ता असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वनमंत्र्यांच्या या आदेशामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. चौकशीच्या आदेशानंतर मुनगंटीवर यांनी वनमंत्र्यांना पत्र लिहित चौकशीचं स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.