नवी मुंबई: पॅराशूटद्वारे अवतरली परदेशी महिला; स्थानिकांमध्ये खळबळ
Parashoot | Representational Image | (Photo Credit: Pixabay)

नवी मुंबईतून काहीसा आगळावेगळा आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) घणसोली (Ghansoli) येथील पाम बीच (Palm Beach) मार्गावर शनिवारी रात्री पॅराशूटद्वारे एक व्यक्ती उतरली. त्यानंतर ती व्यक्ती कारमधून आलेल्या व्यक्तीसोबत निघून गेली. मात्र हा प्रकार समजताच स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले. या प्रकारचा तपास खुद्द नवी मुंबई पोलिसांनीही सुरु केला आहे. मात्र अद्याप ती पॅराशूटद्वारे उतरणारी व्यक्ती कोण होती, याचा उलघडा झालेला नाही.

या प्रकराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांची चौकशी केली असता पॅराशूटद्वारे उतरुन ती कारमधील व्यक्तीसोबत निघून गेली. त्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने आमच्याकडे सरळ दुर्लक्ष केले, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे या परदेशी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिस आता सीसीटीव्हीचा आधार घेत आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही.

मात्र ही महिला नेमकी कोण? हा प्रश्न पोलिसांसोबतच स्थानिकांनाही पडला आहे. तसंच या महिलेचे आगमन काहीसे चिंता, भीती, उत्सुकता वाढवणारे आहे.