Uddhav Thackeray | (Photo Credits: X)

Uddhav Thackeray On Amit Shah: गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणामुळे देशातील राजकारण तापले आहे. आता शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून भाजप (BJP) सातत्याने देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांचे विधान असो किंवा गृहमंत्री अमित शहा यांचे मंगळवारी संसदेत केलेले भाषण असो, भाजप नेते नेहमीच महापुरुषांचा अपमान करत आले आहेत.

अमित शाह यांनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटलं होतं की, 'आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची आता फॅशन झाली आहे, जर तुम्ही देवाचे इतके नाव घेतले असते तर तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता.' अमित शहा यांच्या या विधानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी आक्षेप व्यक्त केला आहे. (हेही वाचा -Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू)

रामदास आठवले यांनी राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे

बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान भाजपला पाठिंबा देणारे पक्ष सहन करतील का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. आंबेडकरांचा अपमान केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या राजीनाम्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (हेही वाचा -Amit Shah vs Mallikarjun Kharge: '15 वर्ष विरोधातच बसावं लागणार आहे...' राजीनाम्याच्या मागणी वर अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं प्रत्युत्तर)

अमित शहांनी माफी मागावी -

या महापुरुषाच्या अवमानाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजप हा तोंडात राम आणि बाजून सुरी ठेवणारा पक्ष असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. गृहमंत्र्यांना आंबेडकरांवर वक्तव्य करायला सांगणारे पंतप्रधान होते का? 'वन नेशन वन इलेक्शन' हे नवे विधेयक भाजपने संसदेत सोडावे आणि आधी आंबेडकरांबद्दल बोलावे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.