Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

 Kokan Railway: यंदा गणेशोत्सवासाठी पहिल्यांदा दिवा ते रत्नागिरी  या मार्गावर धावणारी पुर्णपणे अनारक्षित असलेली पहिली फेरी ते 13 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे.  २ ऑक्टोबरला या विशेष गाड्या रोज धावणार आहे. गाड्यातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे दिवा ते रत्नागिरी अश्या विशेष गाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही गाडी रोज ७.१० वाजता दिवा स्थानकावरून धावणार तर २.५५ ला रत्नागिरी स्थानकांवर पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी ३.४० वाजता रत्नागिरी स्थानकावरून निघेल आणि रात्री ११.४० ला दिवा स्थानकावर पोहचेल. दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी 01153/ 01154 या क्रमांकासह धावणार आहे.

सोबत दिवा स्थानकापासून ते चिपळून स्थानकांपर्यंत स्पेशल गाड्या धावणार आहे. दिवा ते चिपळून मार्गावर धावणारी मेमू स्पेशल गाडी 01155/01156 या क्रमांकासह धावणार आहे. १३ सप्टेंबर पासून ते २ ऑक्टोबर पर्यंत धावणार आहे. दिवा स्थानकांपासून सांयकाळी ८.३५वाजता धावणार तर दुसऱ्या दिवशी १.२५ वाजता चिपळून स्थानकावर पोहचेल. चिपळून स्थानकांवरून हीच ट्रेन १ वाजता धावणार तर सांयकाळी ७ वाजता पोहचणार आहे. कोकण रेल्वेने या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे,