संभाजी महाराज (Photo Credit : Facebook)

तब्बल आठवड्यापेक्षा जास्त काळ सांगली, कोल्हापूर, सातारा येथे महापुराने (flood) थैमान घातले होते. सांगली येथे पुराच्या पाण्याने 2005 सालचा रेकॉर्ड ब्रेक केला, तर कोल्हापूरला चहूबाजूंनी पाण्याने वेढा घातला होता. सध्या या भागात युद्धपातळीवर मदतकार्य चालू आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) यांनी 5 कोटी रुपये मदत म्हणून जाहीर केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील हा एक मोठा महापूर मानला जातो. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. या महापुराबाबत 8 देशांच्या राजदूतांनी संभाजी महाराजांची यांची भेट घेऊन चौकशी केली आहे.

याबाबत संभाजी महाराज यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. दिल्ली येथील संभाजी महाराज यांच्या बंगल्यावर 8 देशांच्या राजदूतांची बैठक पार पडली. पूरस्थितीबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी संभाजी महाराजांची भेट घेतली. जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बुलगारिया, स्पेन, नॉर्वे आणि तुनिसिया या देशांच्या राजदुतांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी संभाजी महाराजांनी या महापुराशी दोन हात करण्यासाठी कसा सामना केला याबाबती माहिती दिली. यावेळी बोलतान ते म्हणाले, 'आज परिस्थिती हळू हळू पूर्व पदावर येत आहे. कोणाही परकीय देशाच्या किंवा राज्याच्या मदतीशिवाय आम्ही या विपरीत परिस्थिती मधून बाहेर येत आहोत. आम्ही स्वतः लढलो आणि जिंकणार सुध्दा ! सर्व समाज यावेळी एकवटला. लोकांचे संसार उभे करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत.'

पहा संभाजी महाराज यांची फेसबुक पोस्ट –

दरम्यान, भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडूनही पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या वैयक्तिक निधीतून त्यांनी ही मदत जाहीर केली आहे. तसेच कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त लोकांना मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका, जे काही द्यायचं आहे ते निस्वार्थ भावनेने द्या असेही आवाहन त्यांनी जनतेला केले होते.