Devendra Fadnavis

First QR Code Chowk: मुंबईतील गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक तयार करण्यात आला आहे. या पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबई शहरातील गावदेवी परिसरातील असलेल्या ह्यूस मार्गावर गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे. मुख्य म्हणजे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून गिरगावात क्यूआर कोड चौक उभारण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यात अनेक दिग्दज मंडळी उपस्थित होती. उद्घाटन कार्यक्रमात सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर केला.

क्यूआर कोड चौकाचे वेगळेपणा काय?

अनेक रस्त्यांना महापुरुषांचे,थोर संतांचे, विचारवंतांचे पुतळे किंवा त्यांच्या नावांची चौक असते. पंरतू शहरात येणाऱ्या पर्यटकांना अथवा नवीन पिढीला त्यांच्याबद्दल योग्य ती माहिती नसते, शहरात राहणाऱ्या लोकांकडे देखील सदर माहिती नसते. त्यामुळे अनेकदा पुतळा कोणाचा आहे ? चौकाला का नाव देण्यात आले हे देखील माहित नसते. पर्यटकांकडून किंवा शहरात येणाऱ्या नव्या लोकांकडून असे साधे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून गावदेवीत ज्येष्ठ गायक, आणि संगितकार सुधीर फडके यांच्या स्मृतीत उजाळा देण्यासाठी त्यांचे नाव एका चौकाला दिले आहे. त्यांच्या नामफलकावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करताच गायक सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

पालकमंत्री मंगल प्रभात लौढा यांच्या निधीतून चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले. श्री विश्वेश्वरानंद महाराज जी, मंत्री मंगलप्रभात लोढा जी, श्रीधर फडके जी, महिला पराग आवळवणी, शरद चिंतनकर, मूळ पुरुष राज पुरोहित, अतुल शाह व इतर मान्यवर उपस्थित होते.