Sharad Pawar | Photo Credit- X

NCP Sharad Pawar Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. महाविकास आघाडीचे तीन पक्ष 85-85 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. बुधवारी शिवसेनेच्या यूबीटीने 65 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली होती.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनीही आपल्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर (NCP Sharad Pawar Candidate List) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (हेही वाचा - Sameer Bhujbal Resigns: महायुतीला मोठा झटका! समीर भुजबळ यांचा राजीनामा; नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढणार अपक्ष निवडणूक)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत 'या' उमेदवारांना संधी -

  • इस्लापूर -जयंत पाटील
  • काटोल - अनिल देशमुख
  • घनसावंगी - राजेश टोपे
  • कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
  • मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड
  • कोरेगाव - शशिकांत शिंदे
  • वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
  • जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
  • इंदापूर - हर्षवर्धन पाटील
  • राहुरी - प्राजक्त तनपुरे
  • शिरूर - अशोक पवार
  • शिराळा - मानसिंगराव नाईक
  • विक्रमगड - सुनील भुसारा
  • कर्जत -जामखेड - रोहित पवार
  • अहमदपूर - विनायकराव पाटील
  • सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे
  • उदगीर - सुधाकर भालेराव
  • भोकरदन - चंद्रकांत दानवे
  • तुमसर - चरण वाघमारे
  • किनवट - प्रदीप नाईक
  • जिंतूर - विजय भाबंळे
  • केज -पृथ्वीराज साठे
  • बेलापूर - संदीप नाईक
  • वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे
  • जामनेर - दिलीप खोडपे
  • मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
  • मुर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे
  • नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे
  • तिरोडा - रविकांत बोपचे
  • अहेरी - भाग्यश्री आत्राम
  • बदनापूर - रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी
  • मुरबाड - सुभाष पवार
  • घाटकोपर पूर्व - राखी जाधव
  • आंबेगाव - देवदत्त निकम
  • बारामती - युगेंद्र पवार
  • कोपरगाव - संदीप वरपे
  • शेवगाव - प्रताप ढाकणे
  • पारनेर - राणी लंके
  • आष्टी - मेहबुब शेख
  • करमाळा - नारायण पाटील
  • सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
  • चिपळूण - प्रशांत यादव
  • कागल - समरजित घाटगे
  • तासगाव कवठे महांकाळ - रोहित पाटील
  • हडपसर - प्रशांत जगताप

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात आता शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे.