महाराष्ट्र परिवहन मंडळाने 'शिवाई' एसटी लॉन्च; एकदाच चार्ज केल्यावर 300 किमी पल्ला गाठणार
शिवाई बस (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र परिवहन मंडाळाच्या एसटी ताफ्यात आता नवीन इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आली आहे. या बसला 'शिवाई' असे नाव देण्यात  आले असून लवकरच नागरिकांना प्रवाशांसाठी सुरु करण्यात येणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते  शिवाई बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सुभाष देसाई यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.

शिवाई बस ही एकदा चार्ज केल्यावर 300 किमीचा पल्ला गाठणार आहे. तर लवकरच राज्यात नागरिकांना प्रवासासाठी शिवाई बस सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत एसटीच्या ताफ्यात अजून दीडशे शिवाई बस दाखल करण्यात येणार आहेत.('Paytm' वर मिळणार एसटीचे तिकिट, या एसटी बसेस चे होणार ऑनलाईन बुकिंग)

एसटी महामंडळात शिवाई ही पर्यावरणस्नेही बस दाखल करत दिवाकर रावते यांनी एसटीचा कायापालय केला असल्याचे कौतुक उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेकडून आज मुंबई मधील एसटी मध्यवर्ती कार्यालच्या बहुमली इमारत, आगर यांसारखे विविध ठिकाणचे भुमिपूजन उद्ध व ठाकरे यांच्या हस्ते पार पडले आहे.