'Paytm' वर मिळणार एसटीचे तिकिट, या एसटी बसेस चे होणार ऑनलाईन बुकिंग
Paytm and ST Bus (Photo Credits: Wikimedia Commons)

ऑनलाईन बँकिंग सुविधा 'पेटीएम' (Paytm) मुळे सध्या ऑनलाईन व्यवहार करणे अगदी सोयीस्कर झाले आहे. पेटीएमद्वारा सध्या ब-याच पद्धतीने व्यवहार होत असतात. त्या जोडीला आता एसटी (ST) बसचेही ऑनलाईन बुकिंग पेटीएम द्वारा होणार आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पेटीएमने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी (ST) भागीदारी केल्याने आता एसटी प्रवाशांना सणांच्या हंगामात याचा खूप फायदा होणार आहे.

भारतातील मोबाईल वॉलेट अॅप पेटीएमने एसटीशी भागीदारी केली असून आता एसटी प्रवाशांना ऑनलाईन तिकिट बुकिंग करता येणार आहे. यात शिवशाही, एसी-शिवनेरी, नाइट एक्सप्रेस, ऑर्डिनरी एक्सप्रेस, डे ऑर्डिनरी, शिवशाही स्लिपर, सेमी लक्झरी आदि बसचे तिकिट बुकिंग करता येईल. ही तिकिटे तुम्ही पेटीएम अॅप किंवा वेबसाइटवरुनही आरक्षित करु शकतात.

हेही वाचा- Paytm युजर्स सावधान! स्मार्टफोनमध्ये 'हे' अ‍ॅप असल्यास बँक खात्यामधून चोरी होतील पैसे

या माध्यमातून बस प्रवाशांना तिकिटासाठी रांगा लावाव्या लागणार नाही. तसेच मनासारखे आरक्षण सीट्स मिळाल्याने प्रवाशांचा एसटी प्रवासही अतिशय सुरळीत आणि सुखकर होईल अशी माहिती अभिषेक राजन यांनी दिली आहे.

पेटीएमची ऑनलाइन एसटी तिकीट सेवा या आधीपासूनच आंध्र प्रदेश परिवहन, राजस्थान परिवहन, गुजरात परिवहन, ओडिशा परिवहन, तमिळनाडू परिवहन महामंडळ येथे सुरू आहे.