Pune Fire: पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग; पुण्यातील जंगली महाराज रोड येथील घटना
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) जंगली महाराज रोड (Jangli Maharaj Road) परिसरात आज दुपारी घडली आहे. त्यानंतर या आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत जवळपास 15 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

वाहतूक पोलीस विभागाने विविध गुन्ह्यात आणि ओढून आणलेल्या गाड्या महापालिकेच्या जागेत काही वर्षांपासून ठेवण्यात येत आहेत. मात्र, आज त्याच वाहनानी पेट घेतल्याचे परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही इतकी भीषण होती की, काही क्षणात अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या आगीची माहिती देताच अग्निशमनदलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीत 10 ते 15 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महत्वाचे म्हणजे, या ठिकाणी साधारण हजाराच्या आसपास दुचाकी आणि चारचाकी वाहन उभे असल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- Prank Video: प्रॅंकच्या नावाने अश्लील व्हिडिओ बनवून फेसबूक, युट्यूबवर करायचे अपलोड; 3 जणांना अटक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना समोर येत आहेत. यापूर्वी मुंबईच्या मानखुर्द परिसरात भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग लेव्हल 3 मध्ये होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती.