ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील गोदामांना आग लागली असून या आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलांच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी देखील भिवंडी येथील गोदामाला आग लागली होती.
Spot visuals: Fire breaks out in a godown in Bhiwandi. Fire tenders present at the spot. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/OTBVMMvqfx
— ANI (@ANI) December 23, 2018
आगीचा फटका बसलेली गोदामं ही प्लास्टिक वस्तू, खेळणी यांची आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.