
Mumbai ED Office Fire: दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित बॅलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालय असलेल्या बहुमजली इमारतीत रविवारी पहाटे भीषण आग (Mumbai ED Office Fire) लागली. तथापि, या अपघातात अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड हॉटेलजवळील आणि ईडी कार्यालय असलेल्या करिमभॉय रोडवरील कैसर-ए-हिंद इमारतीत आग (Kaiser-I-Hind Building Fire) लागली. रविवारी रात्री 2:31 वाजता मुंबई अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली, त्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी एकूण आठ अग्निशमन इंजिन, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, श्वासोच्छवास उपकरणे व्हॅन, एक रेस्क्यू व्हॅन, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल आणि 108 सेवेतील एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट -
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही, परंतु इमारतीतील ईडी कार्यालयातील कागदपत्रे आणि नोंदींचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई ईडी कार्यालयाला आग -
#WATCH | Maharashtra | Firefighting continues at Kaiser-I-Hind building, which houses Mumbai's ED office in Ballard Pier.
The fire broke out at around 2:30 am. 12 fire engines rushed to the spot. The cause of the fire is not clear yet: Mumbai Fire Department pic.twitter.com/YtT8QaITM8
— ANI (@ANI) April 27, 2025
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने सांगितले की, आगीची तीव्रता लक्षात घेता, पहाटे 3:30 वाजता ही आग लेव्हल-2 घोषित करण्यात आली, जी सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे दर्शवते. आग प्रामुख्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित होती.