Dombivali Fire: डोंबिवली (Dombivli) एमआयडीसीमधील (MIDC) 'मेट्रोपॉलिटन' कंपनी भीषण आग (Fire) लागली आहे. या घटनेनंतर कंपनीत एकामागे एक स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसरात भीतीची वातावरण पसरले आहे. तसेच या आगीमुळे एमआयडीसी परिसरात प्रचंड दुर्गंधीही पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशम दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
मेट्रोपॉलिटन कंपनीला आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. सोमवारी माझगावच्या जीएसटी भवनाला आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे ही आग विझवण्यात आली होती. या आगीत जीएसटी भवनामध्ये असलेली महत्त्वाची सर्व कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. (हेही वाचा - शुल्लक वादातून चाकण एमआयडीसीत कंपनी मालकाची दगडाने ठेचून हत्या)
Thane: Fire breaks out in a chemical factory in Dombivali. Four fire tenders rushed to the spot. More details awaited #Maharashtra pic.twitter.com/IkJsYQH0Mk
— ANI (@ANI) February 18, 2020
दरम्यान, माझगाव जीएसटी भवनाला लागलेल्या आगीची कसून चौकशी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले होते. जीएसटी भवनातील सर्व डेटा कॉम्प्युटराईज आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात आग लागली होती. त्यावेळी मी सर्व इमारतींचे स्ट्रक्टरल ऑडीत करुन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आगीचा योग्य पद्धतीने तपास करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.