Mumbai Fire: विक्रोळी पूर्व भागातील रुग्णालयात आग; 6 रुग्णांना बाहेर काढण्यात यश
Fire | Pixabay.com

Mumbai Fire: मुंबईतील विक्रोळी पूर्व भागातील डॉ. आंबेडकर हॉस्पिटलला (Dr Ambedkar Hospital) आग (Fire) लागली. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 1.47 वाजता आग लागल्याचा कॉल आला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि पहाटे 2.25 च्या सुमारास आग विझवण्यात आली.

शिवाजी ढेले (65), विमल तिवारी (60), यशोदाबाई राठोड (58), कांताप्रसाद निर्मळ (75), अरुण हरिभगत (64), सुष्मिता घोक्षे (23) या सहा रुग्णांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. (हेही वाचा -Pune Fire News: पुण्यातील नऱ्हे परिसरात भीषण आग; 10 वाहने जळून खाक)

अधिकाऱ्याने सांगितले की, ही आग तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावरील आयसीयूमधील एअर सक्शन मोटरच्या मुख्य केबलपर्यंत मर्यादित होती. संबंधित अधिकारी आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा - Waluj Hand Gloves Company Fire: हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला आग, 6 जणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर येथील घटना)

मालाडमध्ये इमारतीला आग -

शनिवारी दुपारी मुंबईतील मालाड परिसरात एका 22 मजली इमारतीला आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.