मुंबई: चित्रपट, मालिकांचे शूटिंग आजपासूनच बंद, आदित्य ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलने घेतला निर्णय
Aadesh Bandekar (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) पार्श्वभूमीवर अनेक शाळा, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोना व्हायरस हा गर्दीमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग असल्यामुळे याच्या विषाणूच्या विळख्यात आपण अडकू नये म्हणून प्रत्येक नागरिक योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे. यात नेहमी गर्दीतच वावरणारे आपले सिनेस्टार्स देखील या कोरोना व्हायरसच्या तडाख्यात येऊ नये म्हणून 'इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिल' ने 19 मार्चपासून चित्रपट, मालिकांचे शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या कौन्सिलशी चर्चा करुन आजपासूनच शूटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व चित्रपट तसेच मालिकेच्या कलाकारांनी याबाबत सहकार्य करुन योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही केली आहे.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- Coronavirus: कोरोनाच्या विळख्यातून कसे रहाल सुरक्षित? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून नागरिकांना मोलाचा सल्ला

त्याचबरोबर सर्व मिडियातील प्रतिनिधींनीही स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहनही आदेश बांदेकर यांनी या ट्विटमधून केले आहे.

तर दुसरीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाट्यगृह बंद केली असताना, हातावर पोट असणाऱ्या नाट्यकुटुंबातल्या 23 जणांना प्रशांत दामले यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले आहेत. नाट्य व्यवसाय पुन्हा कधी मार्गावर येतील हे काही सांगता येत नाही, त्यामुळे प्रशांत दामले यांनी केलेली ही मदत अशा लोकांना नक्कीच दिलासादायक ठरू शकेल.