अनियमित पगाराला कंटाळून जळगाव येथील एका एसटी कर्मचाऱ्याने महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) जबाबदार धरत आत्महत्या केली आहे. या घटनेनंर विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. यातच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीदेखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलिसांनी हिंमत दाखवावी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करा, असेही निलेश राणे म्हणाले आहेत. निलेश राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
पोलीसांनी हिंमत दाखवावी आणि उद्धव ठाकरेवर कलम 306 अंतर्गत गुन्हा नोंदवावा. एसटी कामगार तडफडत आपला जीव देत आहे, या सरकारला त्यांच्या जीवाची काय पडलेली नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या एसटी गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या कराव्यात मग बघा प्रश्न सुटतो की नाही, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. हे देखील वाचा- BJP Criticizes Maharashtra Government: भाजप आक्रमक! जळगावमधील एस.टी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, गिरीश महाजन यांची महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका
जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे.