Surgery | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निसर्गामध्ये प्राणी किंवा जीव यामध्ये मादी आणि मानव प्रजातीत महिला गर्भवती राहणे आणि त्यांना जुळे किंवा तिळे जन्माला येणे हे सामान्य आहे. पण, गर्भवती राहिलेल्या महिलेच्या गर्भाशयातील गर्भामध्येही गर्भ (Fetus in fetu) राहणे हे तसे अगदिच दुर्मिळ. खरे तर हा एक नैसर्गिक अपवाद. जगभरामध्ये लाखोंमध्ये एखादीच अशी घटना पाहायला मिळते. ज्याला वैद्यकीय भाषेत गर्भातील गर्भ असे म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यातही अशीच एक विचित्र गुंतागुंत एका गर्भवती महिलेमध्ये पाहायला मिळाली. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये सदर महिलेच्या गर्भात गर्भ असल्याचे आढळून आले. या महिलेवर वैद्यकीय शस्त्रक्रिया (Fetus in fetu Surgery) यशस्वी करण्यात आली. ज्यामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत तसेच गर्भातून दोन अर्भकंही बाहेर काढण्यात आली आहेत. बाळंतीन महिला सुखरुप असल्याचे समजते.

अर्भकाचा आकार तीन इंच

बुलढाणा येथील पीडित महिलेमध्ये भाषेत गर्भातील गर्भ (Fetus in fetu) प्रकारातील गुंतागुंत लक्षात आल्यानंतर तीस रुग्णालया दाखल करुन शस्त्रक्रिया करण्यातत आली. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भातून प्रत्येकी तीन इंच इतक्या लांबीची दोन अर्भकं निघाली. या दोन्ही अर्भकांनी मानवी आकार धारण केला होता. त्यांची शरीरं पूर्ण होऊन ती वाढ होण्याच्या प्रतिक्षेत होती. दरम्यान, संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एकाच वेळी 5 डॉक्टर आणि 4 नर्स आमि इतर कर्मचारी अशा जवळपास 12 जणांच्या चमूने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. शस्त्रक्रिया करण्याताना वेळ लागला पण महिला सुरक्षीत राहिली आणि दोन्ही अर्भकेही बाहेर काढण्यात आली. (हेही वाचा, निसर्गाचा चमत्कार! 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटातून काढला 250 ग्रॅम वजनाचा गर्भ; ऑपरेशननंतर मुलाची प्रकृती स्थिर)

Fetus in fetu प्रकरणे अतिशय दुर्मिळ

जगभरातील काही देशांमध्ये गर्भातील गर्भ (Fetus in fetu) रुग्ण आढळल्याची काही दुर्मिळ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यांचे प्रमाणही अगदिच नगण्य आहे. भारतात आजवर असे एकही प्रकरण आढळले नाही. बुलढाणा येथील बहुदा अशा प्रकारातील हे पहिलेच प्रकरण असल्याची नोंद झाली आहे. अशा प्रकारचा रुग्ण अगदिच दुर्मिळ असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि तितकेच आव्हानात्मक असते. डॉ. उषा गजभिये यांच्या नेतृत्वात सदर महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलेचे सासर आणि माहेरील लोकांकडून डॉक्टरांचे आभार व्यक्त करण्यात आले. (हेही वाचा: ब्राझीलमध्ये मृत महिलेच्या गर्भाशय दानातून गोंडस चिमुकलीचा जन्म, वैद्यकीय इतिहासातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया)

डॉक्टर सांगतात की, सदर महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा तिच्या गर्भाषयातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे निदान झाले. ज्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले गेले. साधारण 5 लाख लोकांमध्ये एखादेच असे प्रकरण पाहायला मिळते. या प्रकारा वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फिटो’ म्हणतात. शस्त्रक्रियेद्वारे जन्मलेल्या बाळाचे वजन 2 किलो 225 ग्रॅम इतके आहे. दरम्यान, या बाळाच्या पोटातील गर्भ काढण्याासठीची शस्त्रक्रिया अमरावती येथील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 11 वाजता पार पडली.